राममंदिर उभारण्यास वक्फ बोर्ड सहमत

0

नवी दिल्ली : बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागेवर राम मंदिराची उभारणी केली जाऊ शकते. राम मंदिरापासून एका विशिष्ट अंतरावर मुस्लीमबहुल भागात मशिदीची उभारणी केली जावी, असे वादग्रस्त बाबरी मशीदप्रकरणी शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यामुळे रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा वाद निकालात निघण्याची शक्यता आहे.

वाद संपुष्टात येईल
बाबरी मशीद शिया वक्फ बोर्डाची होती. त्यामुळे या प्रकरणात इतर पक्षकारांसोबत बातचित करण्याचा अधिकार बोर्डाकडे आहे. संवादाच्या माध्यमातून शांततापूर्ण पद्धतीने समाधानकारक तोडगा काढण्याचा अधिकार केवळ वक्फ बोर्डाकडे आहे. राम मंदिर आणि बाबरी मशिदीची उभारणी झाल्यास अनेक वर्षांपासून सुरु असलेला वाद संपुष्टात येईल. यासोबतच मंदिर आणि मशिदीच्या उभारणीमुळे दररोज सुरु असलेले वाददेखील संपुष्टात येतील. वारंवार अशांतता निर्माण करणारे प्रसंग उद्भवणार नाहीत, असेही शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात सादर केल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

11 ऑगस्टपासून सुनावणी
अयोध्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणीसाठी त्रीसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील समिती 11 ऑगस्टपासून याचिकांवरील सुनावणीला सुरुवात करणार आहे.