राममंदिर बांधण्यासाठी अध्यादेश आणण्यासाठी हुंकार सभा

0

सावद्यात पत्रकार परीषदेत आयोजकांची माहिती

सावदा- शहरात 11 रोजी दुपारी चार वाजता विश्व हिंदू परीषद व बजरंग दलातर्फे राम मंदिर निर्माण होण्यासाठी हुंकार सभा होत असून यासाठी बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक सोहनजी सोलंकी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून राममंदिर बांधण्यासाठी अध्यादेश आणण्यासाठी हुंकार सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विश्‍व हिंदू परीषदेचे जिल्हा मंत्री योगेश भंगाळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा सहकार्य वाहक कालिदास ठाकूर व बजरंग दलाचे जिल्हा संयोजक विक्की भिडे यांनी दिली.

हिवाळी अधिवेशनात अध्यादेशाची मागणी करणार
कालिदास ठाकूर व योगेश भंगाळे म्हणाले की, हुंकार सभा भारत भरातील संतांच्या आदेशाने संपूर्ण भारतात प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येत आहे. याव्दारे सरकारला अयोध्येत राम मंदिर बांधण्याबाबत अध्यादेश लवकर याच हिवाळी अधिवेशनात आणावा यासाठी मागणी करण्यात येणार आहे. याच बाबतीत प्रत्येक खासदार यांना तसे निवेदनदेखील देण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. याबाबतीत उदाहरण देतांना पदाधिकारी म्हणाले की, सोमनाथ मंदिर बांधण्यासाठी तेव्हाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी तसा अध्यादेश आणला होता व त्यानंतर सरकारने ते मंदिर बांधले, असे उदाहरण देखील यावेळी त्यांनी दिले, त्यामुळे असा अध्यादेश काढता येतो असे त्यांनी सुचविले,

30 हजारांवर नागरीकांची उपस्थिती राहणार
पाच एकर जागेत सभा स्थळ असून यात 15 बाय 30 चे व्यासपीठ असून जवळच ठिकठिकाणाहून येणार्‍या वाहनधारकांसाठी पार्किंगची व्यवस्था ककरण्यात आली असून बाहेर गावाहून आलेल्या नागरीकांसाठी अल्पोपहारासाठी केळे तसेच पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. या संघटनांच्या दृष्टीने भुसावळ जिल्हा असून यात भुसावळ, रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, असे तालुके यात असून येथील तसेच इतर भागातील मिळून सुमारे 25 ते 30 हजार नागरीक सभेस उपस्थित रहातील, असा आयोजकांचा अंदाज आहे.