नवी दिल्ली : साध्वींवरील बलात्काराच्या दोन प्रकरणामध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला डेरा सच्चा सौदाप्रमुख गुरमीत रामरहीम सिंगने पंजाब आणि हरियाणा न्यायालयात आव्हान दिले आहे.
रामरहीमवरील आरोप खोटे असून त्याच्यात शारीरिक संबंध ठेवण्याची क्षमताच नाही. त्यामुळे या मुद्द्यासह अनेक मुद्द्यांवर कोर्टात आव्हान देण्यात आले आहे, असे रामरहीमचे वकील विशाल गर्ग नरवाणा यांनी सांगितले. 50 वर्षीय रामरहीमला दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी प्रत्येकी 10 वर्षे अशी 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा पंचकुला विशेष सीबीआय न्यायालयाने ठोठावल्याने रोहतकच्या सुनारिया कारागृहात तो शिक्षा भोगत आहे.