रामलक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्काराची घोषणा

0

मुंबई: संगीतकार विजय पाटील ऊर्फ रामलक्ष्मण यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीत क्षेत्रात योगदान दिलेल्या संगीतकारांना लतादीदींच्या वाढदिवशी 5 लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असा पुरस्कार दिला जातो. त्याच पार्श्वभूमीवर संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल शासनातर्फे दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजय पाटील यांना देण्यात आला आहे.

रामलक्ष्मण यांनी देवानंद, मनमोहन देसाई, महेश भट्ट यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम केलं आहे. रामलक्ष्मण यांची कारकीर्द घडवण्यात लता मंगेशकरांना सिंहाचा वाटा आहे.