रामलीलाला वाजपेयींचे नाव देण्याने मते मिळणार नाही-अरविंद केजरीवाल

0

नवी दिल्ली-दिल्लीतील रामलीला मैदानाला दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव दिले जाण्याची शक्यता आहे. उत्तर दिल्ली महापालिकेने या संदर्भातील प्रस्ताव तयार केला असून ३० ऑगस्ट रोजी हा प्रस्ताव महासभेत सादर केला जाणार आहे. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. अटलजींचे नाव रामलीला मैदानाला दिल्याने भाजपला मत मिळणार नाही असा टोला अरविंद केजरीवाल यांनी लगावला आहे.

भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नाव आता बदलून द्यावे तेव्हाच भाजपला मते मिळतील असा टोलाही केजरीवाल यांनी लगावला. भाजपला आता मते मिळत नसल्याने ते नामांतर करण्याचे राजकारण करीत असल्याचे केजरीवाल यांनी आरोप केले आहे.