वाघाडी । शिरपुरातील रामसिंगनगर येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी शकुर बाबा होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक आर.टी.भोई, शिक्षक पालक संघाचे सुभाष कोळी, भारती राजपूत, शिवा चौधरी, प्रतिक राजपूत उपस्थित होते. याप्रसंगी वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात बालवाडी ते 7 वी अशा 8 वर्गातील 113 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात प्रत्येक वर्गातून प्रत्येकी प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले.
मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषेतून मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषेतून विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करून मान्यवरांची दाद मिळविली. यानंतर शाळेचे उपशिक्षक तुषार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक आर.बी.खोंडे यांनी विद्यार्थ्यांना शाळेत पुण्यतिथी व जयंती साजरी करण्यामागचा हेतू स्पष्ट केला. सूत्रसंचालन उपशिक्षक ए.बी.हातेडकर, विनोद माळी यांनी केले तर आभार उपशिक्षिका एच.एम.मोरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी उपशिक्षिका एस.व्ही.सुर्वे, एस.वाय.चव्हाण, एस.एस.पावरा, एन.आय.राजपूत, वा.बी.कुमावत, शिक्षकेतर कर्मचारी के.आर.अलकरी, बी.ए.पाटील, एम.एम.निकम यांनी कामकाज पाहिले.