*रामानंदनगर पोलिसात आधीच कुंटणखाना प्रकरणी गुन्हा दाखल; एलसीबीने पुन्हा महिलेला ग्राहकांसह रंगेहाथ पकडले
जळगाव : गेल्या काही दिवसांपूर्वी रामानंदनगर पोलिस ठाण्यात कुंटणखाना प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या महिलेला स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी पुन्हा भाडय़ाच्या फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालवितांना रंगेहाथ पकडले आहे . याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेसह तिघांना अटक करण्यात आले आहे .
जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका भाड्याच्या घरात वास्तव्य करुन तेथेच अवघ्या काही दिवसांपूर्वीच महिलेने कुंटणखाना सुरू केला होता. त्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी छापा टाकला. कारवाईत पोलिसांनि कुंटणखाना चालविणार्या महिलेसह ग्राहक कमलेश केसरसिंग सिसोदीया (२०, रा.गणेश कॉलनी, मुळ रा.धारतांडा, मध्य प्रदेश) व प्रवीण सिताराम आहेर (३०, रा.कॅम्परोड, मालेगाव) या दोघांना बुधवारी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याजवळील चार लाख रुपये किमतीची अलिशान कार (क्र.एम.एच.१८ डब्लु २२२) ताब्यात घेण्यात आली.
दरम्यान, संशयित महिलेवर यापूर्वी देखील रामानंद नगर पोलिसात कुंटणखाना चालविल्याचा गुन्हा दाखल आहे. यात एक पीडित तरुणी सोबत होती. असे असतानाही संबंधित महिलेने काही दिवसांपूर्वी जिल्हापेठ पोलिस स्टेशन हद्दीत भाडय़ाच्या फ्लॅटमध्ये कुंटनखाना सुरु केला होता. त्याबाबत माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक बापु रोहम यांनी कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह गुरुवारी छापा टाकला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.