रामाय,रामभद्राय; रामचंद्राय वेधसे

0

भुसावळ। भगवान श्रीराम नवमीनिमित्त शहरातील विविध राम मंदिरांमध्ये दुपारी 12 वाजेच्या सुमारास जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. तसेच विविध संघटनांतर्फे शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. यात सजीव देखाव्यांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी राम भक्तांनी रामनामाचा एकच जयघोष केल्यामुळे संपुर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.

शहरातील अष्टभुजा मंदिरापासून धर्मध्वजाच्या पूजनाने रामनवमीच्या शोभायात्रेला प्रारंभ झाला. धर्मध्वजाचे पूजन शिवसेनेचे उमाकांत शर्मा, रितेश जैन यांच्या हस्ते करण्यात आले. शोभायात्रेत सुवचनांचे फलक, भगवे झेंडे युवकांनी हाती धरले होते.

खिर्डी येथे महाभिषेक
खिर्डी बु येथील श्रीराम मंदिरात रामनवमी साजरी करण्यात आली या वर्षी ही गुढीपाड़वा ते रामनवमी काकड़ा हरिपाठ पारायण करण्यात आले रामनवमीला श्रीरामप्रभूंचा महाभिषेक पुजा रमेश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मंत्रोपचार वेदमूर्ती अभिजित कुलकर्णी यांनी केले. सकाळी हभप भागवत महाराज पाथरीकर यांचा कीर्तनचा कार्यक्रम झाला. व संध्याकाळी 5 वाजता मिरवणूक दिंडी सोहळा काढण्यात आला. हभप श्रीकांत महाराज, हभप पंकज महाराज, हभप गोपाळ महाराज, हभप प्रभाकर महाराज, हभप प्रदीप महाराज यांसह माउली भजनी मंडळातील सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले. ग्रामस्थांसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शोभायात्रेत यांचा होता सहभाग
श्रीरामाच्या जयघोषांनी संपुर्ण शहर दणाणून निघाले. शोभायात्रा आठवडे बाजार परिसरात आल्यानंतर याठिकाणी देखील धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. लक्ष्मीचौकात विनोद शर्मा यांनी पूजन केले. यावेळी दिनेश जोधानी, मनोज चौधरी, हितेश टकले, उमेश जोशी, भूषण महाजन, पियुष महाजन आदी सहभागी झाले होते.

मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम
प्राचिन श्रीराम मंदिरात दुपारी हभप नलिनी वरणगावकर यांचे कीर्तन झालेे. त्यांनी राम चरित्रावर भाविकांना मार्गदर्शन केले. मुर्त्यांचा अभिषेक होवून भजनी मंडळातर्फे रामायण, व्याख्यानमाला व भक्तिगीतांचा कार्यक्रम पार पडला. जन्मोत्सवाप्रसंगी महाआरती होवून प्रसादाचे वाटप श्रीराम चौक व सरिता चौक यांनी केले. त्यांना नगरसेवक प्रा. दिनेश राठी, राधेश्याम लाहोटी, जे.बी. कोटेचा, कैलास चांडक, विनोद शर्मा, श्रीपाद चौक, विनायक चौक, अनिल जोशी, समु इखनकर, किसन बर्‍हाटे, रामवल्लभ झवर, अशोक सराफ, रविंद्र पुरोहित, शाम चौबे, हरिप्रसाद अग्रवाल, मनोज चौक, पंकज चौक, विजय कुळकर्णी, भुषण कुळकर्णी आदींनी सहकार्य केले. याप्रसंगी शहर व परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.