रामेश्‍वर कॉलनीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

0

जळगाव। देवाच्या पुजेसाठी बदामाचे पान घेण्यासाठी जात असलेल्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात धरून एका तरूणाने विनयभंग केला. ही घटना मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास रामेश्‍वर कॉलनी येथे घडली. दरम्यान, अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तरूणाविरूध्द एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी विनयभंग करणार्‍या तरूणास अटक केली आहे.

रामेश्‍वर कॉलनीत मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही देवाच्या पुजेसाठी बदामाच्या झाडाचे पान घेण्यासाठी घराबाहेर निघाली. त्यावेळी मागून येणार्‍या प्रदिप सांडू सपकाळे याने अल्पवयीन मुलीचा हात धरून विनयभंग केला. त्या मुलीने आरडो-ओरडा करताच प्रदिपने त्या ठिकाणाहून पळ काढला. यानंतर दुपारी अल्पवयीन तरूणीने एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत प्रदिप याच्याविरूध्द तक्रार दाखल केली. त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात प्रदिप सपकाळे याच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी त्याला काही तासातच अटक केली आहे.