रामेश्‍वर कॉलनीत अल्पवयीन मुलगी बेपत्ता

0
जळगाव । शहरातील रामेश्‍वर कॉलनी परिसरात असलेल्या एकनाथ नगरातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला सागर कंडारे रा. शांतीनारायण नगर या तरुणाने फुस लावून पळवून नेल्याची घटना 5 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात सागर कंडारे या तरुणाविरुध्द भादवील कलम 363 नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पीएसआय रोहन खंडागळे करीत आहे. तसेच शहरातील हरिविठ्ठल नगरातील वडर गल्लीत राहणार्या 12 वर्षीय मुलीला तिच्या आईने मारल्याने तिने सायंकाळी संतापाच्या भरात घर सोडून निघून गेली. दरम्यान तिच्या आईच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय सोमवंशी करीत आहे.