रामोशी समाजाच्या मागण्यांसाठी निवेदन

0

चाळीसगाव । रामोशी समाज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय दृष्या वंचित असून समाजाच्या मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असते अशा आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार चाळीसगाव यांना रामोशी समाजाकडून देण्यात आले आहे. निवेदनात शासनाला इंग्रजांविरुद्ध बंद पुकारणारे क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या कार्याचा व रामोशी समाजाचा विसर पडलेला आहे. अनेक वर्षांपासून शासन दरबारी माहिती देऊन देखील याची दाखल घेतली गेली नाही.

7 सप्टेंबरला उमाजी नाईकांची जयंती साजरी करा
समाज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय दृष्ट्या वंचित आहेत. महाराष्ट्रातील दाते समितीच्या अहवालानुसार समाजातील 75 टक्के लोक भूमिहीन तर 96 टक्के कुटुंब शासकीय योजनांपासून वंचित आहेत. उमाजी नाईक यांची जयंती 7 सप्टेंबर रोजी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करावी. भिवंडी येथे त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, रामोशी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी उमाजी नाईक आर्थिक महामंडळाची निर्मिती करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वाघ खेडगाव, रमेश रतन वाघ, प्रकाश रामोशी, संजय गोफणे, नांदगाव, जुवर्डी, दहिवडी येथील कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.