मुंबई-महिला माताभगिनींचा अपमान करणाऱ्या आमदार राम कदम यांच्यावर भाजपाने कारवाई करावी अशी मागणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. भाजपने ही कारवाई केल्यानंतर अन्य पक्षांनीही त्यांना उमेदवारी देऊ नये, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत आमदार राम कदम यांच्यावर टीका केली.
भाजपाच्या आमदाराने तारे तोडले असून राम कदम असो किंवा प्रशांत परिचारक किंवा छिंदम ही हिनवृत्तीची माणसे आहेत. वाल्याचा वाल्मिकी करण्याची ताकद भाजपात आहे असे त्यांचे नेते सांगतात. पण हा वाल्मिकी ऋषींचा अपमान आहे, असे त्यांनी सांगितले.
भाजपने आता ‘बेटी भगावो’अभियान सुरु केले आहे की काय असा प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.