राम कदमांचे भाजप प्रवक्तेपद काढले!

0

राम कदमांच्या अडचणी वाढल्या, ट्विट करून माफी मागितली
मुंबई- वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजपच्या प्रवक्तेपदावरून त्यांची उचलबांगडी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. टीकेची झोड उठल्यानंतर तिसऱ्या दिवशी राम कदमांनी माफी मागितली असली तरी जनमानसात त्यांच्याविषयी रोष पाहता भाजप नेतृत्वाने त्यांना प्रवक्तेपदावरून हटविण्याचा निर्णय असल्याची माहिती आहे.

भाजपच्या पक्ष नेतृत्वानेही याप्रकरणाची गंभीर दखल घेत राम कदम यांना त्या दिवसाचा व्हीडीओ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राम कदम चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद सामाजिक आणि राजकिय वर्तुळात उमटले आहे. त्यांच्यावर राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे देखील नोंदविले आहे. कदम यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे.