बार्शी-महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा आमदार राम कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राम कदम यांच्याविरोधात बार्शी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रक्षोभक विधान करुन शांतता भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.