मुंबई – दहीहंडीदिवशी घाटकोपर येथे महिलांबाबत आक्षेपार्ह बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे राम कदमच्या अडचणीमध्ये आणखी भर पडली आहे. महिलांबाबत असभ्य विधान करून त्यांचा अपमान केल्याबद्दल कारवाईची मागणी करणारी याचिका राष्ट्रवादीच्या पुणे शहर महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर २१ सप्टेंबर हायकोर्टात सुनावणी होणार आहे.