राम गणेश गडकरी एकांकिका स्पर्धेत ‘एंट्री एक्झिट’ला प्रथम क्रमांक

0

कूण 24 एकांकिका सादर

पिंपरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, कोहिनूर ग्रुप आणि श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित 19 वी राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत एकूण 24 एकांकिका सादर झाल्या. पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाची ‘एंट्री एक्झिट’ ही एकांकिका गडकरी करंडक आणि पंधरा हजार रुपये मिळवून प्रथम आली. भरत नाट्य संशोधन मंदिराची ‘यज्ञाहुती’ ही द्वितीय क्रमांकावर आल. नवोदिता, चंद्रपूर या संस्थेची ‘नथिंग टू से’ ही तिसरी तर रसिकहो कल्याण यांची ‘एका रुढीत रुतलेलं स्वप्न’ ही उत्तेजनार्थ आली. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि नाना शिवले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी नगरसेवक भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
प्रथम आलेल्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाला दिग्दर्शन प्रथम (अथर्व ठाकरे), अभिनय पुरुष प्रथम क्रमांक (अथर्व ठाकरे, भूमिका-सखा), नेपथ्य द्वितीय (सुयश साळवेकर व अभिषेक बिल्दीकर), पार्श्‍वसंगीत द्वितीय (वेदांत सेलोकर आणि श्रद्धा टिल्लू) अशीही इतर पारितोषिके मिळाली. भरत नाट्य संशोधन मंदिराचे आशुतोष नेर्लेकर यांना दिग्दर्शनाचे दुसरे व अभिनयाचे उत्तेजनार्थ ही पारितोषिके मिळाली. याच संस्थेस स्त्री अभिनय (उमा जोशी, भूमिका- शिखंडी), नेपथ्य प्रथम क्रमांक (विठ्ठल जितेंद्र) आणि प्रकाश योजना प्रथम क्रमांक (सुधीर फडतरे) ही पारितोषिके मिळाली.

कलापिनी तळेगाव यांना उत्तेजनार्थ
चिंचवडमधील नाट्य सिंधू या संस्थेस राजेश कांडर (भूमिका-तात्या) यांना ‘पावने इलो रे’ या एकांकिकेतील अभिनय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. कलापिनी तळेगाव यांना अभिनय पुरुष उत्तेजनार्थ (मिहीर देशपांडे, भूमिका-तो एकांकिका-अंधारकैद) आणि रंगचर्या, पिंपळे गुरव संस्थेच्या एकांकिका ‘तो पाऊस आणि टाफेटा’ मध्ये एकनाथ पडवळ (भूमिका नील) यांना आणि प्रीती चिंचवडे (भूमिका-निकी) यांना अभिनय उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली. नाट्य रसिक हो, कल्याण यांच्या पूनम कुलकर्णी (भूमिका- माणसा) हिला ‘रुढीत रुतलेलं स्वत्व’ या एकांकिकेसाठी अभिनय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. स्त्री अभिनयाची उत्तेजनार्थ पारितोषिके बकुळ धवने (भूमिका-मालविका, संस्था-नवोदिता चंद्रपूर, एकांकिका ‘नथिंग टू से’ व दर्पण संस्था, सातारा यांच्या ‘समर्पण’ एकांकिकेत दीपेंती चिकणे (भूमिका- वहिनीसाहेब) यांनाही मिळाली. प्रकाश योजना प्रथम पारितोषिक भरत नाट्य संशोधन मंदिर ‘यज्ञाहुती’ साठी सुधीर फडतरे आणि द्वितीय पारितोषिक नवोदिता, चंद्रपूर ‘नथिंग टू से’ साठी हेमंत गुहे यांना मिळाले.

पारितोषिक वितरण प्रसंगी नाना शिवले म्हणाले की, नाटक हे चांगला माणूस घडायला कारणीभूत असते असे सांगितले. यावेळी परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहास जोशी यांनी केले. सूत्रसंचालन नरेंद्र आमले यांनी केले. पारितोषिक वाचन गौरी लोंढे यांनी केले. आभार किरण येवलेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन राजेंद्र बंग, रघु ढेमरे, संतोष शिंदे, संतोष रासने , नितीन शिंदे यांनी केले .