राम जन्मला ग सखे राम जन्मला !

0

भुसावळ शहरासह विभागात श्रीराम नवमीनिमित्त शोभायात्रा ; दिंडी, साईबाबांच्या पालखीचे आयोजन ; मिरवणुकीचा जल्लोष ; उत्सवानिमित्त विभागातील मंदिरावर रोशनाई ; मंदिरामध्ये दिवसभर भाविकांची दर्शनार्थ गर्दी

भुसावळ- प्रभू श्रीराम नवमिनिमित्त भुसावळ शहरासह विभागातील राम मंदिरांसह अन्य मंदिरात राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणावर मंदीरात दर्शनासाठी गर्दी झाली. ठिकठिकाणी सायंकाळी मिरवणुका काढण्यात आल्या तर भुसावळ शहरातील साईबाबांच्या पालखीने शहरवासीयांचे लक्ष वेधले.

भुसावळात श्रीराम नवमीचा जल्लोष
शहरातील सराफ बाजारातील मोठ्या मशिदीजवळील श्रीराम मंदिरात 6 ते 12 एप्रिल या काळात श्रीराम नवमी उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शनिवारी राम नवमीनिमीत्त सकाळी 10 ते 12 यावेळात नलिनी वरणगावकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. दुपारी 12 वाजता श्रीरामांचा जन्मोत्सव झाला.

म्युनिसीपल पार्कमध्ये कार्यक्रम
म्युनिसीपल पार्क मधील श्रीराम मंदीर देवस्थान येथेही राम नवमीनिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन शुक्रवार व शनिवारी करण्यात आले. राम नवमीच्या दिवशी सकाळी 6.30 वाजता श्रीराम मुलमंत्र जप, होम, सकाळी नऊला वर्सोधरा, महापूर्णाहुती, कलश पूर्ण पूजा विसर्जन, श्रीराम मुर्तीस महाभिषेक, पंचामृत अभिषेक, श्रीराम जन्मोत्सव झाला. राम नवमीनिमित्ताने मंदीरावर रोषणाई करण्यात आली होती. मंदीराला पताकासह अन्य साहित्याने सजविण्यात आले होते. राम नामाची धून लावण्यात आली होती. दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

साईबाबांच्या पालखीने वेधले लक्ष
श्रीराम नवमीनिमीत्त शहरातून सायंकाळी नगरसेवक निर्मल कोठारी यांच्या नेतृत्वाखाली साईबाबांची पालखी शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. सकाळी 10 वाजता अष्टभुजा देवीच्या मंदीरापासून दिंडीचे आयोजन करण्यात आले. आनंद नगर, व्हीएम वॉर्ड, राममंदीर वॉर्ड तसेच पांडुरंग टॉकीज परिसरातून सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आल्या. राम नवमीनिमित्त शहरातून चार ते पाच शोभायात्रा काढण्यात आल्या.

यावल शहरात श्रीराम नवमी उत्साहात
यावल- शहरात विविध ठिकाणी श्रीराम नवमी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. कोहळेश्वर राम मंदिर, महर्षी व्यास मंदिरावरील श्री राम मंदिर व सातोद रस्त्यावरील श्रीराम मंदिरात जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सुंदर नगर आणि सुतारवाड्यात अभिवादन करून प्रसादाचे वितरण करण्यात आले होते. शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या श्री शनी मंदिरातील श्रीराम मंदिरात सकाळपासुनच श्रीराम नामाचे कीर्तनाने नागरीकांचे लक्ष वेधले. सोमा महाराज, रूपचंद शितुजी घारू, कमलाकर घारू आदींनी कीर्तन सादर केले. हा कार्यक्रम दुपारी 12 वाजेपर्यंत चालला. नंतर मंदिरात आरती करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील वाणी गल्लीतील श्री कोहळेश्वर राम मंदिर संस्थान मंदिरात रामनवमी उत्सवानिमित्त श्रीराम जन्माावर प्रवचनकार निर्मल सुधाकर चतुर यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले. मंदिरात उत्सवासाठी यु.एम.यावलकर, संजय गडे, दिलीप वाणी, दिलीप गडे, मनोज करणकर, मंदार गडेंसह परीसरातील नागरीकांनी परीश्रम घेतले. त्याच प्रमाणे श्री महर्षी व्यास मंदिरातील श्रीराम मंदिरात देखील श्रीराम नवमी निमित्त श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला येथे अयोध्येतील बाल जोगी दासजी महाराज यांच्या उपस्थितीत महाआरती करून प्रसादाचे वितरण करण्यात आले. या ठिकाणी दर्शना करीत भाविकांची गर्दी झाली. सुतारवाड्यात देखील श्रीराम नवमी निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. त्यात श्रीरामाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

फैजपूरात श्रीराम नवमीनिमित्त विविध कार्यक्रम
फैजपूर-
राम जन्मोत्सव निमित्त पूजा, अभिषेक, मिरवणूक काढण्यात आली. आठवडे बाजारातील श्रीराम मंदिरात ट्रस्टी सुनंदा चौधरी व प्रदीप चौधरी यांचे हस्ते अभिषेक, पूजा आरती करून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी 10 ते 12 या वेळेत भक्ति महिला भजनी मंडळ यांचा भजनांचा कार्यक्रम झाला. यात रोहिणी भारंबे, दीपाली चौधरी, आशालता चौधरी, सुरेखा सरोदे, संगीता महाजन यांनी भजन म्हटले. यावेळी शशिकांत चौधरी, पुरोहित गुणवंत जोशी, सुभाष वैद्य, नाना वैद्य, शशी वाढे, संजय चौधरी आदि उपस्थित होते. गावातील राममंदिरात पूजा अभिषेक आरती सातपुडा पतसंस्थेचे व्हा.चेअरमन चंद्रशेखर चौधरी व नगरसेविका नयना चौधरी यांच्याहस्ते करण्यात आली. पुरोहित दीपक पाठक यांनी धार्मिक विधिवत पूजा केली. अंबिका व श्रीराम महिला भजनी मंडळ यांनी भजन म्हटले. यावेळी काशिनाथ वारके, शालिक पाटील, किशोर कोल्हे, विष्णु चौधरी, लहानु चौधरी, देवीदास होले, मंगला टोके आदि भक्तगण यांची उपस्थिती होती.

सतपंथी मंदिरात महामंडलेश्‍वरांनी केली पूजा
सतपंथी मंदिरात प्रवचन, भजन, अभिषेक आरती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्याहस्ते करण्यात आली. हिरामण भिरुड, रोहिदास भिरुड, भरत भंगाळे, अभिजीत सिसोदे, यादव भारंबे, अजित पवार संत खुशाल देवस्थानात रात्री 10 वाजेपासुन अखंड नाम जप करण्यात आला. दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सवानिमित्त अभिषेक आरती सुनील नेवे, सीमा गोवे यांच्याहस्ते करण्यात आली. प्रवीण महाराज, किशोर तांबट, गिरीश नेमाडे, हर्षल वायकोळे, गौरव भंगाळे, जितु भावसार, किरण तांबट, जयेश राणा, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, अनिकेत प्रभु, अंकुश प्रभु, भावसार समाज, ट्रस्टी, महिला भगिनी यांची उपस्थिती होती. गावातील श्रीराम मंदिरापासून सायंकाळी वाजता मिरवणूक काढण्यात आली. मूर्ती पूजन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष महानंदा होले, भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे, जिल्हा दूध संघ संचालक तथा नगरसेवक हेमराज चौधरी, रवींद्र होले, दीपक होले, बंडू सरोदे, संजय रल मिरवणूक समिती अध्यक्ष अध्यक्ष निरज झोपे, उपाध्यक्ष अरुण भोई, खजिनदार कुणाल कोल्हे, सचिव रीतेश चौधरी, सहसचिव सोनू ठाकरे ,सदस्य सचिन मंडवाले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री महाजनांच्या मिरवणुकीत ठेका
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फैजपूर येथे भाजप पदाधिकारी यांची भेट निवडणूक संदर्भात बापू वाघुळदे वर्क शॉप येथे कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर मंत्री महाजन यांनी सुभाष चौकात मिरवणूक आल्यानंतर श्री राम प्रभू यांची पूजा करून थेट तरुणांमध्ये जाऊन रामजी कि निकली सवारी या गाण्यावर ठेका धरत तरुणाचा उत्साह वाढवला. यावेळी आमदार हरीभाऊ जावळे, माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य हर्षल पाटील यासह कार्यकर्ते उपस्थित होते.