राम मंदिरांमुळे अनेक संधी निर्माण होतील; काय आहे मोदींचा लॉजिक?

0

अयोध्या: आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऐतिहासिक राम मंदिराचे भूमिपूजन झाले. पाचशे वर्षाचे स्वप्न आज सत्त्यात उतरले आहे. राम मंदिराच्या भूमिपुजानाने देशात चैतन्याचे वातावरण आहे. दरम्यान राम मंदिर भूमिपुजानावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरामुळे देशात नवनवीन संधी निर्माण होणार आहे. आर्थिक प्रगत होईल असे सांगितले आहे.

प्रभू श्रीराम हा संपूर्ण भारतवासियांचा आस्थेचा विषय आहे. त्यामुळे अयोध्येला भाविकांची दर्शनासाठी गर्दी होईल. देशभरातूनच नाही तर जगभरातून भाविक अयोध्येला येतील. त्यातून आर्थिक चलनाला वेग येईल. यातून आर्थिक अर्थचक्र जोराने फिरण्यास मदत होईल असे मोदींनी यावेळी सांगितले.

भारत हा पर्यटनाच्या दृष्टीने जगात नावारुपाला आहे. भारतात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. पर्यटन क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात अर्थचक्र फिरते. राम मंदिरामुळे देखील भारताला आर्थिक मदत होणार आहे. येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक म्हणून राम मंदिराचे योगदान मोठे राहणार आहे.