राम मंदिराचा कायद्याला संसदेत मान्यता मिळू शकते – न्या. चेलमेश्वर

0

नवी दिल्ली : ‘राम मंदिराचा कायदा संसदेत पास होऊ शकतो. हा कायदा पुढे घटनात्मक व्यवस्थेत टिकेल की नाही हे सांगता येणार नाही. पण संसदेत त्याला मान्यता नक्कीच मिळू शकते’ असा खुलासा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी केला आहे. ते ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराची सुनावणी जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळ भाजप खासदार राकेश सिन्हा यांनी राम मंदिरासाठी विधेयक संसदेत आणणार असल्याचं सांगितलं आहे. याबद्दल अनेक वाद पुढे येत असतानाच चेलमेश्वर यांनाही या बद्दल विचारलं असता यात काहीच गैर नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ‘ सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय कायद्याने बदलता येतात. भूतकाळात अशा घटना घडल्या आहेत. कावेरी विवादासंदर्भातला एक निर्णय न पटल्याने कर्नाटक सरकारने कायदा करून तो रद्दबातल ठरवला होता. त्यामुळे कायदेप्रक्रियेने राम मंदिराचा कायदा निश्चितच होऊ शकतो. असं होण्यास काहीच हरकत नाही’ असं स्पष्टीकरण चेलमेश्वर यांनी दिलं आहे. दरम्यान आगामी अधिवेशनात राम मंदिराचं विधेयक लोकसभेत आल्यावर काँग्रेस त्यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.