नागपूर – अयोध्येत राम मंदिर बनवण्याच्या कामात सर्वात मोठा अडथळा हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख प्रविण तोगडीया यांनी केली.
राम मंदीराच्या मुद्यावरुन विश्व हिंदू परिषदेचे प्रविण तोगडीया यांनी नरेंद्र मोदींवर चांगलाच निशाना साधला. राम मंदिराच्या निर्माण कार्यात मोदीच मोठा अडथळा असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. मोदींना रामाचे फकीर बनवून पाठवले, पण ते मुस्लिमांचे वकील बनले असल्याचे तोगडीया म्हणाले. गेल्या ३२ वर्षांपासून आम्ही राम मंदिराबाबत संसदेत कायदा तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आमचा विश्वासघात केला असल्याचेही तोगडीया म्हणाले.
आम्ही लखनऊवरुन २१ ऑक्टोबरला अयोध्येकडे कूच करणार आहोत. यामध्ये देशातील वेगवेगळ्या भागातून रामभक्त येणार आहेत. सत्तेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका महत्त्वाची असूनही राम मंदीराबाबत निर्णय होत नाही. संघानी राम मंदीराबाबत कायदा तयार करण्याचे आदेश देणे गरजेचे असल्याचेही तोगडीया म्हणाले.