राम मंदिरासाठी अध्यादेश आणण्यास जेडीयूचा विरोध

0

अयोध्या- अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी होत आहे. विश्व हिंदू परिषद, शिवसेनेकडून अध्यादेश आणण्याची मागणी होत आहे. मात्र एनडीएचे घटक पक्ष असलेले जनता दल यूनाइटेड (जदयू)ने मात्र अध्यादेश आणण्यास विरोध दर्शविला आहे.

भाजप जर राम मंदिरासाठी अध्यादेश आणणार असेल तर जदयू एनडीएतून बाहेर पडेल असा इशारा देण्यात आला आहे. राम मंदिरासाठी अध्यादेशाचा समर्थन जेडीयू करणार नाही. राम मंदिराचा मुद्दा उपस्थित न करता देखील भाजप निवडणुका जिंकू शकते. पाच राज्यातील पराभवाचा राम मंदिराशी काहीही संबंध नसल्याचे जदयूकडून सांगण्यात येत आहे.