राम मंदिरासाठी आता जास्त काळ प्रतिक्षा करू शकत नाही-भैय्याजी जोशी

0

नवी दिल्ली- अयोध्यामध्ये राम मंदिर व्हावे या मागणीसाठी आज रामलीला मैदानवर विश्व हिंदू परिषद धर्मसभा घेत आहे. धर्मसभेसाठी देशभरातून साधू-संत आणि हिंदू समाज बांधव रामलीला मैदानावर जमलेले आहे. यावेळी सभेला संबोधित करतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यंवाह भैय्याजी जोशी यांनी आता आम्ही राम मंदिर बांधण्यासाठी अधिक काळ प्रतिक्षा नाही करू शकत नाही असे सांगितले. राम मंदिरासाठी लवकरात लवकर कायदा करा असे आवाहन भैय्याजी जोशी यांनी केले.

राम मंदिर उभारण्याचे आश्वासन देणारा पक्ष आज सत्तेत आहे त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर घोषणा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सकाळपासून देशभरातून हिंदू बांधव रामलीला मैदानावर मोठ्या संख्येने गर्दी करत आहे.