राम मंदिरासाठी कोर्टात जाणे हा मूर्खपणा-संभाजी भिडे

0

नंदुरबार: राम मंदिरासाठी न्यायालयात जाने हा मूर्खपणा आहे. कोण न्यायाधीश आणि हा नालायकपणा कशासाठी? असा अजब तर्क संभाजी भिडेंनी लढवला आहे. नंदूरबार शहरातल्या श्रॉफ हायस्कूलमध्ये त्यांनी हे विधान केले. रायगडावर उभारल्या जाणाऱ्या ३२ मण सुवर्ण सिंहासनासाठी सरकारची एक दमडीही घेणार नसल्याचे सांगत रायगडावर संभाजी महाराजांचाही पुतळा स्थापन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

राम मंदिरासाठी न्यायालयात जाणं हा मूर्खपणा आहे, कोण न्यायाधीश आणि हा सर्व नालायकपणा कशासाठी?, असा खडा सवाल करत संभाजी भिडे गुरुजींनी या साऱ्या प्रकरणावरुन समाजाला लक्ष केल आहे. संभाजी भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीमध्ये नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कुल मध्ये सभा पार पडली. सुवर्ण सिंहाण पुन संस्थापना संकल्प पूर्तता आवाहनासाठी त्यांनी नंदुरबार मध्ये ही सभा घेतली. यावेळी त्यांनी हिदुस्थान हा जगातील एक सर्वाधिक प्रभावी देश असल्याचे अनेक दाखलेही दिले.

सरकारकडून पैसे घेणार नाही
रायगडावर उभारल्या जाणाऱया ३२ मन सुवर्ण सिंहासणासाठी सरकारचा एक दमडीही घेणार नसल्याचे सांगत त्यांनी रायगडावर संभाजी महाराजांचा पुतळाही स्थापीत करणार असल्याची घोषणा केली. त्यांनी राज्यातल्या प्रत्येक तालुक्यातुन या सिहांसणाच्या खड्या पहारा योजनेसाठी दोन हजार लोकांची एक टिम तयार करण्याची घोषणाही केली. संभाजी भिडे गुरुजींच्या या कर्यक्रमाला दलित संघटनांनी विरोध केला होता त्या पर्शवभूमी वर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौंज फाटा तैनात करण्यात आला होता.