नवी दिल्ली-लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. तत्पूर्वी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित झाला आहे. देशभरातून हिंदू बांधवांकडून राम मंदिर उभारणीची मागणी होत आहे. दरम्यान आज शिवसेनेने देखील संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करत लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने अध्यादेश आणावा अशी मागणी केली आहे.
शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी याबाबत मागणी केली. दरम्यान राफेल व इतर प्रश्नावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातलेला होता. आनंदराव अडसूळ यांनी गदारोळातच ही मागणी केली. अखेर अडसूळ यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.