राम मंदिरासाठी पूर्ण जमीन हवी, तुकडा नको-विहिप

0

अयोध्या-देशभरात राम मंदिराचा मुद्दा गाजतो आहे. राम मंदिराच्या निर्मितीबाबतीत संत-महंत यांनी तीव्र भूमिका घेतली आहे. दरम्यान आज विश्व हिंदू परिषदेची धर्मसभा घेण्यात आली. यावेळी राम मंदिरासाठी संपूर्ण जमीन हवी तुकडा नको अशी मागणी करण्यात आली. विहिपचे अंतरराष्ट्रीय महामंत्री चंपत राय यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

राय यांनी आम्हाला हिस्सेदारीतील जमीन नको आहे, पूर्ण जमीन हवी अशी मागणी केली. अयोध्येत राम मंदिर व्हावे हे प्रत्येक हिंदूचे स्वप्न आहे त्यामुळे हे स्वप्न कोणत्याही परिस्थिती पूर्ण होणार आहे असे राय म्हणाले.