राम मंदिरासाठी मोदींना पाठविले रक्ताने लिहिलेले पत्र

0

मथुरा: लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित होतो आहे. अयोध्येत राम मंदिर व्हावे ही गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. दरम्यान हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने लिहिलेले पत्र पाठविले आहे. अयोध्येत राम मंदिर कधी उभारणार अशी मागणी यात करण्यात आली आहे. सोबतच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील पत्र पाठविले आहे.

राम मंदिरासाठी संसदेत अध्यादेश आणण्याची मागणी होत आहे.