राम मंदिरासाठी मोरारी बापू यांच्याकडून पाच कोटींची देणगीची घोषणा

0

भावनगर: अयोध्येतील राम मंदिराचे येत्या 5 ऑगस्टला भूमीपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन होईल. राम मंदिर उभारणीसाठी संपूर्ण देशातून मदत दिली जात आहे. दरम्यान प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापू यांनी पाच कोटी रुपयांची देणगी राम मंदिर बांधकामासाठी दिली आहे. डिजिटलच्या माध्यमातून मोरारी बापू यांनी रामकथा वाचन केले. यावेळी व्यासपीठावरुन राम मंदिर बांधण्यासाठी पाच कोटी रुपये देण्याची घोषणा केली. राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना तसेच विविध क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले आहे. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत, लालकृष्ण आडवाणी यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

राम मंदिराच्या बांधकामासाठी प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापू यांनी पाच कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, राम मंदिरासाठी देशातील सर्व हिंदूंकडून पैसे गोळा केले जातील, असे विश्व हिंदू परिषद म्हटले आहे.

चित्रकूट धाम तलगाजरडा येथील आश्रमशाळेच्या वतीने रामजन्मभूमीसाठी पाच लाख रुपये दिले जातील. तसेच, श्री रामांचा भक्त आणि राम मंदिरासाठी दान देऊ इच्छित असतील तर त्याच्या वतीने पाच कोटी रुपयांची देणगी दिली जाईल. राम मंदिर बांधण्यासाठी प्रत्येक गावातील आणि शहरातील लोकांकडून देणगी गोळा केली जाईल, जेणेकरून राम मंदिराचे बांधकाम लोकसहभागातून होईल आणि त्यात सर्व हिंदूंचे पैसे असतील, असे विश्व हिंदू परिषदेने म्हटले.