नवी दिल्ली : राम मंदिराचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने राम मंदिर उभारणीला विरोध केल्यास दोन्ही सरकार पाडू, असा इशारा भाजपाचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.
Subramanian Swamy: If our matter (#RamTemple) is listed in January, we'll win it in 2 weeks. Because my 2 opposing parties are central government & UP government; do they've the guts to oppose me? And if they do, I'll topple government. Though I know that they won't do it. (7.11) pic.twitter.com/mzhVpvFdqQ
— ANI (@ANI) December 7, 2018
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एका कार्यक्रमात सुब्रमण्यम स्वामी यांनी हा इशारा दिला. राम मंदिर उभारणीचं प्रकरण जानेवारीत पटलावर येणार असून ते आम्ही दोन आठवड्यात जिंकू. केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार हे दोन्ही पक्षकार आमचे विरोधक आहेत. मला विरोध करण्याची त्यांची हिंमत आहे का? जर त्यांनी मला विरोध केला तर मी सरकार पाडेन. मात्र ते मला विरोध करणार नाहीत हे मला माहीत आहे’, असं स्वामी यांनी म्हंटले आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्यास मुस्लीम समाजाचा विरोध नसल्याचा दावाही केला आहे. मुघल सम्राट बाबरने ताब्यात घेतलेला हा भूखंड आमचा आहे, असं सुन्नी वक्फ बोर्डाने म्हटलं आहे. पण त्या जागेवर पुन्हा मशीद उभारायची आहे, असं त्यांनी म्हटले नाही, असंही सुब्रमण्यम स्वामी यांनी निदर्शनास आणून दिलं.