हरिद्वार: अयोध्यामध्ये राम मंदिर उभारण्याचा प्रश्न कोर्टातून नव्हे तर संसदेतूनच सुटेल. त्यासाठी संसदेवर दबाव टाकला जात आहे’, असं योग गुरु बाबा रामदेव यांनी म्हंटले आहे. ‘कोर्ट आणि संसदेनं राम मंदिर उभारलं नाही तर देशात बंडाळी माजू शकते’, असा इशाराही बाबा रामदेव यांनी दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी रामदेव बाबा हरिद्वारमध्ये आले असता त्यांनी हा इशारा दिला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी बालकृष्णही उपस्थित होते. यावेळी त्यांनी राम मंदिराचा प्रश्न संसदेतूनच मार्गी लागेल, असं स्पष्ट सांगितलं. या आधीही रामदेव बाबांनी राम मंदिराची उभारणी न झाल्यास देशातील सामाजिक वातावरण बिघडेल आणि त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होईल, असा इशारा दिला होता.