पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्यावतीने राबविला उपक्रम
पिंपरी : अयोध्या येथे प्रभू श्री राम मंदिर उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्यावतीने शहरात विविध ठिकाणी महाआरती कऱण्यात आली. रामनगर चिंचवड येथे महाआरती करण्यात आली. यावेळी ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’ अशा शिवमय घोषणा देण्यात आल्या. यावेळी मधुकर बाबर, प्रकाश बाबर, अॅड. ऊर्मिला काळभोर, नगरसेविका मीनल यादव, नगरसेवक प्रमोद कुटे, नाना काळभोर, आकाश मोरे, आप्पा कुलकर्णी, दिलीप सावंत, प्रकाश बाबर, रवींद्र इनामदार, ज्ञानेश्वर शिंदे, अमोल निकम, रामचंद्र बाबर, भाई भोसले, भाविक देशमुख, फारुख शेख, राम उत्तेकर, निखील पांढरकर, सर्जेराव मारमुरे, दिपक शेंडे, अशोक लसकर, रामा भोसले, माऊली जगताप, प्रल्हाद पाटील, वैभवी घोडके, कामीनी मिश्रा, स्वरुपा खापेकर, डॉ. वैशाली कुलथे, सारीका तामचीकर, निकिता तिडेकर, भाग्यश्री म्हस्के, निखील येवले, सुखदेव दौंडकर, सागर शिंदे, सागर पाचरणे, सोनु संधु, बबलू शेठ आदी उपस्थित होते.
मुस्लिम महिलांनीही केली आरती
हे देखील वाचा
शिवसेना महिला आघाडीच्यावतीने चिखली सानेचौकातील साई मंदिरात महाआरती करण्यात आली. पारंपरिक पेहराव केलेल्या पाचशे महाराष्ट्रीयन, बंगाली, राजस्थानी, गुजराती महिलांनी महाआरती करत रामनामाचा जप केला. तर, बुरखा घातलेल्या मुस्लिम महिलांनीही हाती पंचपाळ घेत महाआरतीत सहभाग घेत समाजापुढे आदर्श निर्माण केला. घंटानादाने सानेचौक परिसर दुमदुमुन गेला. बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, सनातन संस्था या हिंदुत्ववादी संघटनांसह शेकडो भाविक या महाआरतीत सहभागी झाले होते. तत्पुर्वी, कृष्ण मंदिर ते साई मंदिर दरम्यान भव्य शोभायात्रा काढण्यात आली. राम, लक्ष्मण, सीता अशी वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शोभायात्रेत अग्रभागी असलेल्या श्रीक्षेत्र आळंदीतील वारकर्यांनी टाळ मृदुंगांचा निनाद अन् मुखी विठ्ठल-विठ्ठल नामाचा अखंड गजर केला. गळ्यामध्ये तुळशी माळ, कपाळावर केशरी गंध, हातात टाळ-चिपळ्या, मुखी विठुरायाचा जप अन् मनात रामनामाचे स्मरण करणाछया वैष्णवांच्या मांदीयाळीने वातावरण भारावून गेले.
नागरिकांनी अनुभवला सोहळा
शेकडो भाविकांनी हा सोहळा डोळ्यात साठविला. भोसरी पंचक्रोशीतून अनेक भाविक दुचाकी रॅलीने शोभायात्रेत सहभागी झाले होते. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हासंघटक सुलभा उबाळे, शिवसेना विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट यांनी या महाआरतीचे संयोजन केले. महिला आघाडी संपर्क संघटिका वैशाली सूर्यवंशी, सुशीला पवार, शशिकला उभे, स्मिता जगदाळे, रुपाली आल्हाट उपस्थित होते. या महाआरतीसाठी मोरेवस्ती शाखेचे सर्जेराव भोसले, अनिल सोमवंशी, सतीश दिसले आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.