नवी दिल्ली: अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या राम मंदिर प्रकरणी अखेर सुप्रीम कोर्टाने निकाल देत वादग्रस्त जमीन रामलल्लाला तर पर्यायी पाच एकर जागा मशिदीसाठी दिले आहे. दोघांना समान न्याय दिल्याची भावना व्यक्त होत होती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे मुस्लिम लॉ-बोर्ड फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करणार आहे. ९ डिसेंबर पर्यंत ही याचिका दाखल केली जाणार आहे.
राम मंदिर प्रकरणी निकाल आल्यानंतर देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दोन्ही पक्षकाराकडून याचे स्वागत करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा फेरविचार याचिका दाखल केली जाणार आहे.