राम मंदिर भूमिपूजन राष्ट्रीय एकतेची संधी व्हावी: प्रियांका गांधी-वाड्रा

0

नवी दिल्ली: उद्या ५ ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. भारतात दिवाळीप्रमाणे राम मंदिर भूमिपूजनाचा उत्सव साजरा होणार आहे. तत्पूर्वी राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळी आपले वक्तव्य जाहीर करत असून भूमिपूजनाला शुभेच्छा देत आहेत. दरम्यान कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा यांनी देखील राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्वीटकरून आपले वक्तव्य जाहीर केले आहे.

यात त्यांनी “साहस, संयम, त्याग, वचनबध्दता हे प्रभू रामाचे विशेषण आहेत. राम सर्वांमध्ये आहे, सर्वांसोबत आहे. श्रीराम आणि माता सीता यांचा संदेश राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रमानिमित्ताने दिला जावा. हा कार्यक्रम राष्ट्रीय एकता, बंधुता आणि संस्कृतीत एकतेची संधी व्हावी” असे मत प्रियांका गांधी-वाड्रा यांनी व्यक्त केले आहे.