राम रहीमची हनीप्रीत नेपाळला पळाली

0

पंचकुला । बलात्कारी राम रहीमची खास हनीप्रीत नेपाळमध्ये पळून गेली आहे. उदयपूरहून अटक करण्यात आलेल्या डेरा मेंबर प्रदीप गोयल उर्फ विक्कीने हा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांना प्रदीपसह हनीप्रीतची लोकेशन उदयपूरच्या एका मॉलमध्ये आढळली होती. याआधारे पोलिसांनी माग काढला. हनीप्रीतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल असुन रामरहिमला पळवून नेण्याचा कट, दंगे घडविण्याचा आरोप आहे.

हनीप्रीतने उदयपुरात काढला पळ
प्रदीप गोयल हरियाणाचा, परंतू तो उदयपूरमध्ये राहत होता.
हनीप्रीत मागच्या अनेक दिवसांपासून उदयपुरात राहत आहे. तेथील सेलेब्रेशन मॉलमध्ये प्रदीपसह तिची लोकेशनही ट्रेस झाली होती.
याआधारेच तिथे पोलिस गेले, प्रदीप मात्र अलगद जाळ्यात अडकला. त्याने सांगितले की, हनीप्रीत नेपाळमध्ये पळून गेली आहे.
पोलिसांनी प्रदीपचा मोबाइल जप्त केला आहे. ज्यात राम रहीम आणि हनीप्रीतशी निगडित महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.
सूत्रांनुसार, सुनावणीच्या दिवशी राजस्थानहून 15 ते 20 बसेस भरून पंचकुलामध्ये माणसे जमली होती. यातील 2 बसेस उदयपुरातून आल्या होत्या.
प्रदीप उदयपुरात राम रहीमच्या भक्तांचे नेटवर्क पाहायचा. राजस्थानातून बसेस नेण्याची जबाबदारी त्याच्याच खांद्यावर होती.
प्रदीप मोठी गर्दी जमवण्यासाठी आदिवासींना पैशांचे आमिष दाखवले होते, दंगा भडकावण्यासाठी आधीच या बसेस हरियाणासाठी रवाना झाल्या होत्या.