रायंगण फाट्याजवळ ट्रकच्या धडकेने दोन जखमी

0

नवापूर । रायंगण गावाचा फाट्याजवळ कारला ट्रकने मागुन धडक दिल्याने गाडीचा पुर्णपणे चक्काचुर झाला. या भीषण अपघातात एक जण गंभीर तर दोन किरकोळ जखमी झाले असुन अपघात घडताच 108 वर संपर्क करून 108 ला पाचारण करण्यात आल्याने तत्काळ 108 रुग्णवाहिकेवरील डॉ राहुल सोनवणे व पायलट लाजरस गावीत यांनी घटनास्थळी येऊन जखमी झालेल्या व्यक्तीना उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले.

जखमींवर उपचार
वैद्यकीय अधिकारी प्रविण चौरे यांनी प्राथिमक उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल केले. अपघातात ट्रक नंबर एम एच 18 जीबी 1876 व वेगानर कार नंबर जीजे 05 जेइ 9452 आहे. या अपघातात गाडीतील सुनिल अर्जुन सुर्यवंशी (वय 20) लताबेन शशिकांत निकुम (वय 54) शशिकांत निकुम (वय 53) जखमी असुन उपचार सुरु आहेत.