चाळीसगाव। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त 11 एप्रील रोजी रायगडावर ढोल वाजवण्याचा कार्यक्रम आयोजित करणार्या श्री. शिवाजी रायगड स्मारक मंडळ व या कार्यक्रमाचे आयोजक राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांचा चाळीसगाव येथे सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने 6 एप्रिल 2017 रोजी निषेध करण्यात आला असून तशा आशयाचे निवेदन तहसिलदार चाळीसगाव यांना देण्यात आले. हा कार्यक्रम रद्द न झाल्यास तिव्र स्वरुपाच्या भावना व्यक्त होतील असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर सह्याद्री प्रतिष्ठान उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दिलीप घोरपडे, अजय जोशी, रविंद्र सूर्यवंशी, शरद पाटील, प्रदीप राजपूत, विनोद शिंपी, मुन्ना पगार, सुर्यकांत कदम, रवींद्र निकम, मुराद पटेल, विजय गायकवाड यांची उपस्थिती होती.
संपूर्ण महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी म्हणजे शिवभक्तांसाठी काळा दिवस आहे. त्या दिवशी दुख व्यक्त केले जाते, या दिवशी रायगडावर ढोल वाजवणे म्हणजे मुर्ख पणाचा कळस आहे याच दिवशी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्या आयोजनातुन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.