रायगड जिल्हा अजिंक्यपद योग स्पर्धा

0

रायगड । बृहन्महाराष्ट्र योग परिषद यांच्या मान्यतेने रायगड जिल्हा योग संघटनेतर्फे संतोष गुरव स्मृती 12 व्या रायगड जिल्हा अजिंक्यपद योग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नागोठणे येथील जे. एच. अंबानी पेट्रोकेमिकल विद्यालय येथे खेळवण्यात येणार्‍या 12 व्या रायगड जिल्हास्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 8 ते 11 वर्षे मुले व मुली, 11 ते 14 वर्षे मुले व मुली,14 ते 17 वर्षे मुले व मुली, 17 ते 21 वर्षे मुले व मुली, 21 ते 25 वर्षे, 25 ते 35 वर्षे आणि 35 ते 60 वर्षे पुरुष व महिला अशा लढती होतील. या स्पर्धेतून निवड झालेला संघ 6 ते 8 ऑक्टोबर रोजी मोर्शी, अमरावती येथे होणार्‍या 36 व्या राज्यस्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. स्पर्धेसाठी मुले व पुरुष – हाफ पँट, मुली व महिला – योगा कॉस्च्युम किंवा स्लॅक्स आणि टी-शर्ट असा पोशाख असणे आवश्यक आहे.

या स्पर्धा संघटनेच्या खालील नियमानुसार होतील 1) प्रत्येक स्पर्धकांना त्यांच्या वयोगटाच्या योगासन अभ्यासक्रमातील लॉटरी पद्धतीने काढलेली 5 आसने करावयाची आहेत.2) प्रत्येक स्पर्धकाने आसनाच्या अंतिम स्थितीत 30 सेकंद स्थिर राहणे आवश्यक आहे.तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकाने, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, शाळेचे ओळखपत्र / जन्म तारखेचा पुरावा, आधार कार्डची झेरॉक्स घेऊन येणे. इच्छुक मुलामुलींनी, महिला व पुरुष तसेच संघांनी, शाळांनी मोठ्या संख्येनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन रायगड जिल्हा योग संघटनेचे अध्यक्ष अदितीताई तटकरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संदीप गुरव (9960702510), डी.के. म्हात्रे (9766349372),उत्तम मांदारे(8433561332), हेमंत पयेर (9860601736), तुषार जाधव (9511861816) यांच्याशी संपर्क साधावा.