रायगड जिल्हा निवड चाचणी कॅरम स्पर्धा

0

रायगड । रायगड जिल्हा कॅरम संघटनेतर्फे 17 सप्टेंबर रोजी रायगड जिल्हास्तरीय कुमार व किशोर गटाची जिल्हा निवड चाचणी कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रोहिदास समाजमंदिर बांधणी, तालुका – अलिबाग येथे रंगणार्‍या या स्पर्धेत 21वर्षांखालील मुले व मुली, 18 वर्षांखालील मुले व मुली, 14 वर्षांखालील मुले व मुली, 12वर्षांखालील मुले व मुली अशा आठ गटांमध्ये सामने खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतून आगामी राज्य अजिंक्यपद स्पर्धांसाठी कनिष्ठ गटाचे रायगड जिल्ह्याचे संघ निवडण्यात येतील.

राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा 23 व 24 सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणार आहे. स्पर्धेच्या प्रवेशिका 15 सप्टेंबरपर्यंत स्वीकारल्या जातील. अधिक माहितीसाठी विजय टेमघरे 9970050809, दीपक साळवी 9975597177, 7857681280 अभिजित तुळपुळे 9372211828, 9270770294 , मनिष जोशी 7387555570, 7045996275 , सचिन नाईक 9222171260 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा कॅरम संघटनेचे कार्यवाह दीपक साळवी यांनी केले आहे.