अलिबाग : मुलगा-मुलगी समान, तसेच स्त्री-भ्रुण हत्येविरोधात करण्यात येणारी जनजागृती तसेच कठोर कायद्यांमुळे रायगड जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ होत असली तरीही मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर कमीच असल्याचे विदारक वास्तवही समोर आले आहे. आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून 2016 या वर्षात जिल्ह्यात दर हजार मुलांमागे 958 मुलींचा जन्म झाल्याचे उघडकीस आले आहे. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी सरकार स्तरावर विविध उपायोजना तसेच कठोर कायदे करण्यात येत आहेत. गर्भनिदान करु नये यासाठी जनजागृती करण्यात येत असून, गर्भनिदान करणार्याा सोनोग्राफी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे. पथनाट्य, भित्तीपत्रकांच्या माध्यमातून स्त्रीभ्रृण हत्या रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच सरकार स्तरावरील सुकन्या योजना, सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना अशा प्रोत्साहनपर योजनांची जिल्ह्यात अंमलबजावणीही सुरु आहे. मात्र एवढे करुनही जिल्ह्यात मुलींचा जन्मदर घटतच चालल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.
सहा सोनोग्राफी केंद्रांवर कारवाईवंशाचा दिवा म्हणून काहीजण मुलाचाच आग्रह धरित असल्याने जिल्ह्यात आजही जन्माला येणार्याि मुले आणि मुलींची संख्या समसमान होऊ शकली नसल्याचे दिसून येते. मुलगी परधन मानून मुलासाठी हट्ट धरणारी दाम्पत्ये आजही समाजात कमी नाहीत. सोनोग्राफीद्वारे गर्भातच असणार्याल बाळाचे लिंगनिदान करून मुलगाच असल्याची खात्रीही करून घेतली जात असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात आत्तापार्यंत बेकायदा गर्भनिदान करणार्यात सहा सोनोग्राफी केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे.
जनजागृतीमुळे मुलींचा जन्मदर वाढतोयजनजागृती तसेच कठोर कायद्याच्या अंमलबजावणीमुळे जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढत आहे. 2013मध्ये दर हजार मुलांच्या मागे 909 मुलींचा जन्म झाला होता. ते प्रमाण वाढून 2016 मध्ये हजार मुलांच्या मागे 958 मुलींचा जन्म झाला आहे. मात्र अजूनही मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर कमीच राहिला आहे.
वर्ष हजार मुलांमागे जन्माला येणार्या मुलींची संख्या2013 – 9092014 – 9102015 – 9342016 – 958
गर्भनिदान प्रतिबंधक समितीमार्फत मागील सोनोग्राफी करणार्या केंद्रांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. गर्भनिदान करु नये यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रनेमार्फत जनजागृती करण्यात येत आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. तसेच विविध माध्यमातून मुलगा-मुलगी समान, स्त्री-भ्रुण हत्या करु नये, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
– सचिन देसाई जिल्हा आरोग्य अधिकारी