रायगड जिल्ह्यामध्ये लवकरच विशेष कक्ष

0

पोलादपूर । पोलादपूर तालुक्यातील मूळ रहिवासी ग्रामस्थांना शहराकडून खेडेगावांकडे परण्यासाठी विविध प्रकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती आणि नागरी सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू असून याचाच एक भाग म्हणून मुंबई व अन्य शहरातून गावाकडे परतणार्‍यांसाठी रायगड जिल्ह्यात लवकरच विशेष कक्ष सुरू करण्यात येईल तसेच या कक्षाद्वारे स्वदेस फाऊंडेशनच्या मदतीने व जिल्हा उद्योग केंद्र, नाबार्ड, कौशल्य विकास, मुद्रा, खादी ग्रामोद्योग या विभागांची मदत घेऊन उद्योग निर्मिती करण्यास प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी येथे दिली.

पोलादपूर तालुक्यातील मुंबईकर ग्रामस्थांची ’आपल्या गावाला परत चला’ या अभियानांतर्गत राजर्षी शाहू सभागृह, दादर,मुंबई येथे मिटींग आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी विस्तृत विवेचनासह चाकरमानी ग्रामस्थांसोबत संवाद साधला. रायगड जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी खुपच संधी उपलब्ध आहेत,देशी-विदेशी पर्यटकांना आपल्या गावातील घरामध्ये, शेतीमध्ये निवास व न्याहरीची व्यवस्था केल्यास अनेक कंपन्या व संस्था आपल्या गावामध्ये पर्यटक पाठवायला मदत करण्यास तयार आहेत. यासाठी गावाकडे परत येणे हा चांगला पर्याय आहे व जे लोक गावाकडे परत येतील व कोणताही उद्योग सुरु करतील.