पुणे । पंजाबने दिलेल्या 73 धावांचे तुटपुंजे आव्हान पुण्याच्या संघाने 12 षटकात पार केले आहे. नाणेफेक जिंकून पुण्याने आधी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत पुण्याच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांना मोठी खेळी करू दिली नाही. पंजाबने 15.5 षटकात रायझिंग पुणे सुपरजायंट्ससमोर केवळ 74 धावांचे आव्हान ठेवले होते. पुण्यात आणि पंजाबमध्ये आयपीएलच्या 10 व्या सत्रातील 55 वा सामना होत आहे. प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. परंतु पुण्याच्या गोलंदाजांपुढे पंजाबचे फलंदाज मात्र नांगी टाकताना दिसले. 20 षटकाच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ केवळ 15 षटक खेळून फक्त 73 धावा करू शकला. मुंबई इंडियन्स विरोधात दमदार खेळी करणारे पंजाबचे फलंदाज पुण्याच्या गोलंदाजां पुढे अपयशी ठरले. अक्षर पटेलने सर्वाधिक 22 धावा केल्यात. ऋद्धिमान साहा 13 धावा करून झेलबाद झाला. मार्टिन गप्टिल आपले खाते न उघडताच तंबूत परतला. शॉन मार्शही फक्त 10 धावा करून तंबूत परतला.
मुंबईच्या खात्यात 20 गुण तर 18 गुणांची नोंद
गुणतालिकेत मुंबई इंडियन्स संघ पहिल्या स्थानी असून मुंबईच्या खात्यात 20 गुण तर पुण्याच्या खात्यात आजच्या विजयाने 18 गुणांची नोंद झाली आहे. गुणतालिकेत 17 गुणांसह सनरायजर्स हैदराबाद तिसर्या तर 16 गुणांसह कोलकाता नाइट रायडर्स चौथ्या स्थानी आहे. पुणे संघाला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आज विजय आवश्यक होता आणि सगळे काही पुण्याच्या मनासारखे घडत गेले. नाणेफेकीचा कौल पुण्याच्या बाजूने लागला आणि पंजाबला प्रथम फलंदाजीला पाचारण करण्यात आले. स्टीव स्मिथचा हा निर्णय योग्य ठरला आणि पुण्याच्या गोलंदाजांनी पंजाबची अक्षरश: दाणादाण उडवली. पुण्याने अवघ्या 73 धावांत पंजाबला गुंडाळले. त्यानंतर हे माफक आव्हान पुण्याने अवघ्या 12 षटकांतच 9 गडी राखून पूर्ण केले. 3 षटकांत 12 धावा देऊन 2 बळी टिपणारा तसेच अफलातून थ्रो मारून इऑन मॉर्गनला रनआउट करणारा जयदेव उनाडकट सामनावीर ठरला.
पंजाब संघाच्या धावसंख्या याप्रमाणे
मार्टिन गुप्टिल (0), वृध्दिमान साहा (13), शॉन मार्श (10), इऑन मॉर्गन (4), राहुल तेवतीया (4), ग्लेन मॅक्सवेल (0), अक्षर पटेल (22), मोहित शर्मा (6), स्वप्निल सिंग (10), इशांत शर्मा (1) आणि संदीप शर्मा नाबाद राहिला असे एकूण संघाने 15 षटकांत 73 रन बनविले आहे. रायझिंग पुणे संघातील जयदेव उनाडकत, अदम झाम्पा आणि डॅनीयल ख्रिश्चन यांनी प्रत्येकी 2 आणि शार्दुल ठाकूर- 3 यांनी बळी घेतल्या आहे. पुणे किंग्ज इलेव्हन पंजाबवर सहज मात करून रायजिंग पुणे सुपरजाएंट संघाने प्ले-ऑफमधील आपलं स्थान पक्कं केलं आहे. या विजयासह पुणे संघाने गुणतालिकेत दुसर्या स्थानी झेप घेतली आहे. दरम्यान, पुण्याच्या विजयाने पंजाबचं प्ले-ऑफचं स्वप्नं भंगले असून मुंबई, पुणे, हैदराबाद आणि कोलकाता हे चार संघ प्ले-ऑफमध्ये भीडणार आहेत. प्ले-ऑफमध्ये पुण्याची लढत मुंबईशी तर हैदराबादची लढत कोलकाताशी होणार आहे.