रायन स्कूलच्या सुरक्षेचे तीनतेरा

0

मुंबई । एकीकडे गुरुग्राममधील रायन स्कूलमध्ये सात वर्षांच्या प्रद्युम्नची हत्या झाल्यने देशभर खळबळ उडाली आहे. तर मुंबईतल्या कांदिवलीमधील रायन स्कूलची झाली आहे. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच दारुच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे कांदिवलीच्या रायन स्कूलचे मुख्य प्रवेशद्वार सोडता इतरत्र कुठेही सुरक्षारक्षक नाही. त्यामुळे शाळेच्या कम्पाऊड वॉलवरुन कोणीही उडी मारुन शाळेच्या आवारात प्रवेश करु शकते. या शाळेतील बसवर ड्रायव्हर आणि कंडक्टर्सना कायमस्वरुपी ठेवण्यात आले नसून त्यांच्याकडे ओळखपत्र नसल्याचे त्यांनी सांगितले. पालकांकडून मोठी फी उकळणारी रायन स्कूल विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी किती हलगर्जी बाळगते, हे या उदाहरणांवरुन आता उघड झाले आहे.

गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी हरियाणा पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. रायन इंटरनॅशनल ग्रुपचे मुख्यालय मुंबईत असून ग्रुपचे सीईओ रायन पिंटो, व्यवस्थापकीय संचालक ग्रेसी पिंटो आणि अध्यक्ष ऑगस्टिन पिंटो यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.