रायपुर। येथील रहिवासी व मुंबई येथे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेले मनोज अर्जुन ठाकूर हे महाराष्ट्र ाज्य लोकसेवा आयोगामार्फत खातेअंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मनोज परदेशी यांचे 10 वी पर्यतचे शिक्षण भुसावळ तालुक्यातील वराडसिम येथील पंडीत नेहरू विद्यालयात झाले. तर त्याने पुढे बी.ए.ची पदवी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून घेतली आहे. ते 2016-17 मध्ये मुंबई येथे पोलीस खात्यात रुजू झाले. मनोज ठाकूर हे इयत्ता 10 वी परीक्षा नापास झालेले असतानाही निराश न होता जिद्द बाळगून त्यांनी पुढील शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पूर्ण केले व यश संपादन केले. त्यांचे आई-वडील शेतकरी आहेत. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.