रायपुर ग्रामपंचायतीचे चार सदस्या अपात्र

0

जळगाव- ग्रामपंचायतीची कर नोटीस मिळून सुध्दा भरणा न करणाऱ्या रायपुर ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे़ याबाबत नुकतीच त्यांना नोटीस बजाविण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे़.

रायपुर येथील ग्रामपंचायत सदस्य योगिता चरण सुर्यवंशी, भारती राजेंद्र परदेशी, राजुसिंग बिसनसिंग परदेशी, सोनाली प्रकाश परदेशी यांच्याकडे ग्रामपंचायतीची कर अर्थात घरपट्टीची थकबाकी असल्यामुळे हा कर त्वरीत तीन महिन्यांच्या आत भरवा, अशा सुचना करण्यात आल्या होत्या़ दरम्यान, तीन महिने उलटून सुध्दा कर भरणा न केल्यामुळे चौघा सदस्यांविरूध्द अपात्रेची नोटीस २३ आॅगस्ट रोजी जारी करण्यात येऊन ती ती तलाठी यांच्या मार्फत रायपुर ग्रामपंचायतीला देण्यात आली होती़ त्यानंतर ही नोटीस नुकतीच संबंधित चोरही सदस्यांना बजावण्यात आलेली आहे.