थोरगव्हाण : प्रगतशील शेतकरी गणेश यशवंत राणे यांच्या रायपूर शिवारातील पाच एकर शेतातील उसाला आग लागल्याने हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकर्यावर संकट कोसळले आहे. आगाीनंतर परीसरातील शेतकर्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला तर ग्रामपंचायत सदस्य नितीन चौधरी यांनी सावदा नगरपालिकेच्या बंबाला पाचारण केले असता तो पर्यंत निम्म्याहून अधिक ऊस खाक झाला. महसूल प्रशासनाने पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी होत आहे.