नवापुर । नवापुर तालुक्यातील रायपुर येथे भारत सरकार माहिती आणि प्रसारण मंत्रालय केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयांची विविध जनकल्याणकारी उपक्रमांची आणि योजनांची माहिती जनतेपर्यत पोहोचविण्यासाठी एक विशेष जन जागृती अभियान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमात विविध कल्याणकारी उपक्रमांची आणि योजनांची माहिती व्याख्याने मार्गदर्शन व प्रभातफेरी काढण्यात आली.
गावाच्या विकासासाठी एकजुट दाखविण्याची गरज
यावेळी जि. प अध्यक्ष रजनी नाईक यांनी योगाचे महत्व सांगून पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला. आपले गाव हे मॉडेल म्हणुन तयार करा. गांवाचा विकास हा एकजुटीने होत असतो. प्रत्येक शेतकरी वर्गाने आपल्या शेताचा बांधावर. वृक्ष लागवड करा असे सांगितले. यानंतर जिल्हाधिकारी डॉ मल्लीनाथ कल्लशेटी, पं.स सभापती सविता गावीत व उपसभापती दिलीप गावीत,ए.टी कोकणी यांनी विविध वैद्यकीय उपचार व शासनाच्या योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले. तसेच वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांनी वृक्षलागवडीवर अधिक लक्ष देण्याचे आवाहन केले.
स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस
कार्यक्रमात अंगणवाडी रायपुर ग्रामपंचायत कार्यालय रायपुर आदर्श माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय रायपुरमध्ये आरोग्यावर आधारित सुद्दढबालक स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धी, निबंध स्पर्धा आणि गीत आणि नाटक विभागाकडुन प्रसिध्द जादुगर राज अँड पार्टी सोनगीर यांचे जादुचे प्रयोग दाखवुन जनजागृती करण्यात आली. सर्व स्पधांर्ममध्ये प्रथम, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांना बक्षिसींचे वाटप जि.प.अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हाधिकारी डॉ मल्लीनाथ कल्लशेटी, सविता गावीत, दिलीप गावीत, तहसिलदार प्रमोद वसावे,जालमसिंग गावीत, नंदकुमार वाळेकर, प्रथमेश हाडपे, सरपंच ईश्वर गावीत यांचा हस्ते करण्यात आले.