मुंबई : सुशांत सिंग राजपुत लवकरच ‘रायफलमॅन’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा टीजर आज १५ जानेवारीला सैन्य दिनानिमीत्तने रिलीज केला आहे. अलिकडेच त्याच्या ‘सोनचिडीया’ चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला होता.
https://www.instagram.com/p/BsqDsialvk_/?utm_source=ig_embed
या टीजरवरुन धाडसी सैन्याचे चित्रण चित्रपटातून करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत बॉलिवूडमध्ये सैन्यावर आधारित अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत. भारतीय सैन्याबद्दल प्रेक्षकांच्याही मनात आदरयुक्त स्थान आहे. सैन्याचे धाडसी चित्रण पडद्यावर पाहायला मिळत असल्याने प्रेक्षकांचा या चित्रपटांकडे कल असतो.