धुळे । रायफल शूटींग स्पर्धेत तनिष्का पाठक हिने यश संपादन केले आहे. तिची नाशिक विभाग स्तरावर निवड झाली आहे. नाशिक येथे होणार्या विभागीय स्पर्धेमध्ये धुळे जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी तनिष्काला मिळाली आहे. 14 वर्ष वयोगटातील आंतर जिल्हा स्पर्धेत तनिष्काने रौप्य पदक पटकावून विभाग स्तरावर जाण्याचा बहुमान मिळवला.
कनोसा कॉनव्हेंट हायस्कूल मधील 6 वी मध्ये शिक्षण घेणार्या तनिष्काला कनोसा हायस्कुलचे क्रीडा प्रशिक्षक सर विश्वास, जिल्हा क्रिडा संकुलातील रायफल प्रशिक्षक कपिल बागूल व विपीन सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनिस यांचे मार्गदर्शन तनिष्काला वेळोवेळी मिळाले. तनिष्का ही जिल्हा कोषागार संघटनेचे अध्यक्ष उदय पाठक यांची कन्या आहे. तिच्या यशाबद्दल जिल्हा कोषागार अधिकारी गजानन पाटील यांच्यासह सर्व कर्मचारी वृंद यांनी तनिष्काचे अभिनंदन करुन उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.