नवी दिल्ली: केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला स्वतंत्र दर्जा असलेले कलम ३७० रद्द केले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात याचीच चर्चा सुरु आहे. विरोधी पक्ष या निर्णयाला विरोध करत असतांना कॉंग्रेसचे रायबरेलीच्या आमदार अदिती सिंह यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाला पाठींबा दर्शविला आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरबाबत जोर निर्णय घेतला आहे, त्याला माझा व्यक्तिगत पाठींबा असल्याचे आमदार अदिती सिंह यांनी म्हटले आहे. अदिती सिंह ह्या गांधी कुटुंबियांच्या अतिशय निकटवर्तीय मानल्या जातात.