पतसंस्थेला सुरुवातीपासून मिळतोय ‘अ’ दर्जा
चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातील विविध उद्योग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. पतसंस्थेने यंदा 25 वर्ष पूर्ण केली असल्याने पतसंस्था यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. वाल्हेकरवाडी चिंचवड येथे ही सभा कामगार क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. या सभेमध्ये सभासदांच्या हिताचे विविध ठराव मंजूर करण्यात आले. यंदा ही पतसंस्था रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. पतसंस्थेने गेली अनेक वर्ष सभासदांच्या हिताचे उपक्रम राबविले आहेत. ही पतसंस्था माथाडी कामगारांसाठी आकर्षक कर्ज योजना राबविल्या आहेत.
रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी खासदार श्रीरंग बारणे, शिरूर लोकसभा संघटक सुलभा उबाळे, उपशहर प्रमुख युवराज कोकाटे, युवा सेनेचे सचिन सानप, शिवसेना संस्थेचे अध्यक्ष ज्ञानोबा मुजुमले, सभेचे अध्यक्ष खंडू गवळी, संस्थेचे सचिव सतीश कंठाळे, संस्थेचे खजिनदार विजय खंडागळे, संचालक भिवाजी वाटेकर, ज्ञानेश्वर घनवट, रोहित नवले, ज्ञानेश्वर औताडे, प्रकाश चोरे, पाराजी व्यवहारे, सुभाष पुजारी, ललिता सावंत, पुष्पा काळे, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद, सल्लागार बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष किसन बावकर, मुरलीधर कदम, कार्याध्यक्ष परेश मोरे, सरचिटणीस प्रवीण जाधव, सचिव पांडुरंग कदम, सर्जेराव कचरे, खजिनदार नागेश व्हनवटे आदी सभासद उपस्थित होते.
कामगारांच्या हिताला प्राधान्य
यावेळी बोलताना कामगार नेते इरफान सय्यद म्हणाले की, पतसंस्थेचे काम सध्या एकजुटीने, काटकसरीने आणि कामगारांच्या हिताला प्राधान्य देत सुरु आहे. हे काम असेच अविरत पुढे चालू ठेवावे. महाराष्ट्र मजदूर संघटना वेळोवेळी माथाडी कामगारांच्या बरोबर उभी आहे. तसेच संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे व संस्थेचे संचालक भिवाजी वाटेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. पतसंस्थेने सभासद आणि कष्टकरी कामगारांच्या उन्नतीसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. यापुढे देखील संचालक मंडळ कामगारांचे हित लक्षात ठेवूनच काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला.