जळगाव। येथील जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा.मयुरी गचके स्पोर्ट्स एरोबिक्स (जीमनास्टीक) या खेळ प्रकारात पुढील आयोजित एशियन व रशियन चेम्पियनशीप स्पर्धेत त्या भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. नुकत्याच झालेल्या गोवा येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी एरोबिक्स व्यक्तिगत कांस्य, व ट्रायोमध्ये सुवर्णपदक (संयुक्त) असे दोन पदक पटकावीत त्यांनी एशियन व रशियन चेम्पियनशीप स्पर्धेत स्थान मिळविले.
ट्रायोमध्ये पटकविले सुवर्णपदक
नुकत्याच झालेल्या स्पर्धेत संपूर्ण भारतातील एकूण 20 संघ सहभागी झाले होते. सहभागी संघांवर मात करीत त्यांना व्यक्तिगत द्वितीय क्रमांकवर समाधान मानावे लागले. मात्र ट्रायोमध्ये (संयुक्त) सुवर्णपदक ही त्यांनी पटकावले. निवड झालेल्या स्पर्धकांची पुढील एशियन चेम्पियनशीप स्पर्धा परदेशात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र रशियन चेम्पियनशीप स्पर्धा 24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान रशियामध्ये मॉस्को येथे पार पडणार आहेत. गोवा येथे पार पडलेल्या स्पर्धेचे परिक्षक म्हणून वर्ड चेम्पियन इरिना कडेशेवा, केसिनिया बाटेलोवा, फिसाफचे उपाध्यक्षा ताटीयाना पोलुखीना व डी.के.राठोड यांनी काम पहिले. प्रा.मयुरी गचके यांची एशियन व रशियन चेम्पियनशीप स्पर्धेत निवड झाल्याबद्दल इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक प्रीतम रायसोनी, प्राचार्य डॉ.प्रभाकर भट, विभागप्रमुख प्रा.हरीश भंगाळे यांनी अभिनंदन केले. त्यांना प्रशिक्षक राहुल पहुरकर यांचे मार्गदर्शन मिळाले.